मुंबई : उद्याच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालायने नकार दिल्यानंतर(supreme court) आता शरद पवारांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. संविधानाचा आदर असून उद्याचा बंद मागे घ्या असे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या या आवाहनानंतर आता मविआतील नेते काशाप्रकारे दाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत पवारांनी एक्सवर एक ट्विट केले आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक(supreme court) बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता.
तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन पवारांनी केले आहे.
बदलापूर् येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून उद्या (दि.24) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला दणका दिला आहे. कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली.
उद्याचा महाराष्ट्र बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये. उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या बंदसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ते दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा:
इचलकरंजीत एसटीतून उतरताना सहा तोळ्याचा गंठणचा बॉक्स चोरीला….
सांगलीतील तरुणाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवली जीवनयात्रा
प्रकाश आवाडेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा! तर्क वितर्क यांना उधाण…..