सोशल मीडियावर(social media) कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अलीकडे भोंदू बाबांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेक लोक साधू-महाराज बनून लोकांना फसवत आहेत. तर नागरिक देखील अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत आहे. अंगात देवी येणे, माता येणे, असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत.

यासंबंधित अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत. कुठे कोणी शक्ती दाखवून पंखा थांबवत आहे, तर कुठे पाण्यावर तरंगणारे बाबा दिसत आहेत, तर कुठे भूत-पिशाच घालवणारे बाबा पाहायला मिळत आहे. पण अनेदा या बाबांच्या ढोंगीपणामुळे अनेकांवर अन्यायाच्या, गैरवर्तनाच्या प्रकाराच्या घटना घडल्याच्या समोर आले आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक आई आपल्या चिमुकल्या मुलासोबत गैर कृत्य करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(social media) तुम्ही पाहू शकता की, एक लाल रंगाची साडी नेसलेली महिला दिसत आहे. तिच्या अंगात देवी आल्याचे म्हटले जात आहे. तसेच आसपास लोकांची गर्दी देखील दिसत आहे. या देवीच्या म्हणजेच महिलेच्या मांडीवर एक चिमुकले बाळ दिसत आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, बाळाला बोलते करण्यासाठी त्याला मारले जात आहे. तुम्ही पाहू शकता अंगात देवी आलेली महिला अतिशय क्रूरपणे बाळाला मारताना दिसत आहे. बाळ अगदी जीवाच्या आकांताने रडत आहे. तरीही देवीच्या म्हणजेच महिलेला काहीच वाटत नाही. बाळाचे अश्रू पाहूनही ती त्याच्या छातीवर जोरजोरात मारत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ummeed27news या अकाऊंटवर शेअर करण्याता आला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिलेवर आणि तिथे उपस्थित सर्व लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.
चिमुकल्यासोबतचा गैरप्रकार पाहू एका युजरने म्हटले आहे की, त्या बाईला काही वाटत कसं नाही, बिचारं बाळ किती रडत आहे असे म्हटले आहे. आणखी एका युजरने हरामखोर आहेत ही लोकं, एवढ्या छोट्या बाळाला कसे काय मारु शकतात. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार बाळाला बोलता येत नसल्याने हा सर्व प्रकार सुरु आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! धावत्या ट्रेनसमोर महिलेने उडी घेतली अन्…; भयानक अपघाताचा Video Viral
व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ सेटिंग्ज आत्ताच चेंज करा अन्यथा…
भर मैदानात राडा! बुमराह आणि नायर यांच्यात झाली जोरदार बाचाबाची, व्हिडीओ