मनसे अध्यक्ष राज ठाकरे(politics) यांची डोंबिवलीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील रोखठोक भाष्य करत त्यांनी आपल्या हाती सत्ता देण्याचे आवाहन जनतेला केले.तसेच, मुख्यमंत्र्याच्या सभेआधी झालेल्या नृत्यावरुन ‘हीच का लाडकी बहीण योजना?’ असं म्हणत चिमटा देखील काढला.
“मुख्यमंत्र्याच्या हाताखाली यंत्रणा असते, त्यांना सर्व माहिती पुरवत असते. असं असताना देखील त्यांच्या (उद्धव ठाकरे) हाताखालून 40 आमदार गेले? ते इकडे बघत असताना खालच्या खाली 40 आमदार गेले. त्यावेळी शिंदे म्हणाले होते की, अजित पवारांसोबत बसणं म्हणजे श्वास घेत येत नव्हता आणि नंतर अजित पवारच मांडीवर येवून बसले. हे राज्याचे भवितव्य आहे का?”, असा संतप्त सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
“या फोडाफोडीच्या राजकारणाला|(politics) शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांनी आधी काँग्रेस फोडली, नारायण राणे फोडले, आता हे राजकारण. संपलं, आता पक्ष ताब्यात घेतात. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नाही, तर बाळासाहेबांची आहेत. घड्याळ आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे अपत्य आहेत.”,असं म्हणत राज ठाकरे यांनी पक्षफूटी आणि चिन्हावरून झालेल्या संघर्षावर स्पष्ट मत मांडले.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी एक बाई भोजपूरी गाण्यावर नाचतेय. ही लाडकी बहीण योजना आहे? आपण कुठे चाललो आहोत. व्यासपीठावर नाचायला मुली आणल्या जाताय. या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे.
महाराष्ट्र बरबाद झाला तर छत्रपतींचं नाव घेता येणार नाही. इतके प्रश्न प्रलंबित असताना चेष्टा सुरु आहे. जिंवत आहात ना? जागे आहात ना?”, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी जनतेला केला.
“महाराष्ट्रासाठी जागे व्हा. अनेकांचा डोळा या महाराष्ट्रावर आहे. तुमचं यावर लक्ष असलं पाहिजे. हे जे सगळं सुरु आहे ते तुम्ही बंद केले पाहिजे. एकदा माझ्याकडे सत्ता देऊन बघा”, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा :
प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला
हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव
बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप