सोशल मीडियावर(social media) रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून माणूस विचारात पडतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा फिटनेसचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. लोक जीम करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात.सध्या असाच एक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अलीकडे अनेक लोक फीटनेस फ्रीक झाले आहेत. त्यामध्ये आता महिलांचा विशेषत: गृहीणींची देखील समावेश आहे. पण अनेकदा महिला साडी नेसून जीम करताना दिसतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा असाच आहे. एका महिलेने साडी नेसलेली असताना वेटलिप्टींग केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) मोठ्या प्रमामात व्हायरल होत आहे. तिने साडीमध्ये वेटलिफ्टिंग करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका वेटलिफ्टर महिलेने साडी घातली आहे आमि ती वेटलिफ्टींग करत आहे. व्हिडिओमध्ये महिलेने मेंदीची हिरवी साडी नेसली होती आणि बेल्ट लावून 140 किलो वजन गुडघ्यापेक्षा वर उचलण्याचा प्रयत्न केला आहे.हॅपी न्यू इयरचे गाणे, “कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले” बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर varshana_rana या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे.
या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारोजणांनी पाहिले असून लाईक केले आहे. अनेकांनी महिलेचे कौतुक करत व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘140 किलो वजन उचलणे हा विनोद नाही.’ तर काही लोकांनी वजन 120 किलो असल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या एका युजरने “दीदी, ही एक मोठी लढाई आहे.” असे म्हटले आहे. तर एकाने मजेशीर कमेंट करत आपल्या मित्रांना म्हटले आहे की, ‘आता तरी किमान जिममध्ये जा.’ तर एकाने लिहिले आहे की, मला अशी मुलगी हवी आहे.
हेही वाचा:
सांगलीत भर पावसात पुल ओलांडणारा तरुण गेला वाहून
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सेटवर मोठी दुर्घटना, चेहरा भाजला Video Viral
रक्तातील घाण कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ पाण्याचे सेवन