बसमध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला महिलेने, 25 वेळा कानशिलात हाणलं अन् Video Viral

महिलांची(Woman) सुरक्षा हा आपल्या देशातील एक मोठा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत. मात्र तरीही हा प्रश्न फारसा दूर झालेला नाही. आजही महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना घडत असतात. गुन्हेगारी प्रवृतीची लोक खुलेआम स्त्रियांची छेड करण्याचा प्रयत्न करतात.

येत्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या. सध्या देखील अशीच आणखीन एक घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आता वेगाने व्हायरल होत आहे. बसमधून प्रवास करताना एका महिलेची दारुड्याने छेड काढली मात्र यावेळी ती शांत बसली नाही तर तिने भरबसमध्येच त्याची जिरवली.

ही घटना पुण्याची आहे, जिथे एका बसमध्ये एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत महिलेची(Woman) छेड काढत होता. हा सर्व प्रकार बघून महिला मूग गिळून गप्प बसली नाही तर तिने तरुणाला जन्माची अद्दल घडवण्याचे ठरवले आणि भरबसमध्ये प्रवाशांसमोर त्याची धुलाई करायला सुरुवात केली. महिला अवघ्या काही मिनिटांतच व्यक्तीला 25 कानाखाली लगावते. महिलेचा हा रुद्रावतार पाहून सर्वच थक्क झाले तसेच अनेकांनी महिलेचे कौतुकही केले. आता नक्की या प्रकरणात काय आणि कसे घडले? याविषयी सविस्तर तपशील जाणून घेऊयात.

व्हायरल व्हिडिओ सुरु होताच तुम्ही पाहू शकता की, बसमध्ये एक व्यक्ती उभा आहे, त्याच्यासमोर एक महिला भयंकर संतापलेल्या मनःस्थितीत असून ती या व्यक्तीला एका मागून एक कानशिलात लागवण्यास सुरुवात करते. महिलेचे हे रौद्र रूप पाहून व्यक्ती घाबरतो आणि आपण केलेल्या कृत्याची हाथ जोडून माफी मागू लागतो. व्यक्तीला मारताना महिला, माझ्या अंगावर हात टाकतोस. तू दारू प्यायला आहेस, म्हणून कुठेही हात लावशील का? आई वडिलांनी हे वळण लावलं” असा जाब विचारताना दिसून येते.

या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुण्यातील महिलेने मद्यधुंद व्यक्तीला बसमध्ये कथितपणे त्रास दिल्याबद्दल 25 वेळा कानाखाली मारले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकजण जबाबदारीने प्या. काहीही असो, सार्वजनिक ठिकाणी महिलेचा छळ करणे मान्य नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शाब्बास बाई”.

हेही वाचा :

अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर

आज या 5 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, अचानक धनलाभाचे संकेत