महिला पोलिसाची वर्दी खेचत विनयभंग; हिंसाचार करणाऱ्यांकडून अश्लील शिविगाळ अन् चाळे

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हिंसाचारामध्ये अनेक गाड्यांची तोडफोड झाली. मात्र याचबरोबर या हिंसेदरम्यान एका महिला(Woman) पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणावरुन आता संताप व्यक्त केला जात आहे.

नागपूरच्या चिटणीस पार्कवरुन सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी सायंकाळी हिंसा सुरू असताना ही लाजिरवाणी घटनाही घडली. महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला(Woman) पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न करत त्यांना विवस्त्र करण्याचे प्रयत्न ही केले. या कृत्याची महिला(Woman) पोलीस कर्मचाऱ्यांनी रीतसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नोंदवली आहे. त्यानंतर या संदर्भात नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच जमावाने त्या ठिकाणी उपस्थित इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्यावरही हल्ला केला. हिंसाचार करणारे ड्युटीवर तैनात असलेल्या अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे पाहून अश्लील इशारे करत होते. तसेच या हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांकडे पाहून अश्लील शेरेबाजी करण्यात आली अशी ही तक्रार समोर आली आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी, पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, असं म्हटलं आहे. पोलीस आणि मुख्यंत्राच्या माहितीमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. त्यामुळे गृहमंत्री सक्षम आहेत. हा सारा हल्ला नेमका कोणत्या यंत्रणेचं अपयश आहे याबाबत ते नक्कीच चौकशी करतील, असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे.

नागपूरमधील हिंसाचारानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमाशी संवाद साधताना नेमके किती पोलीस जखमी झालेले याची माहिती दिली होती. नागपूरमध्ये जी दुर्भाग्यपूर्ण घटना झाली त्यामध्ये 33 पोलिसांना जबर मारहाण झाली आहे. पोलिसांवर दगडफेक झाली. सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मारहाण झाली. त्यामधील दोघेजण आयसीयूमध्ये आहेत. बाकी तिघांना उपचार करुन दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं बावनकुळेंनी सांगितलं. सदर हिंसाचारामध्ये 45 वाहनांची तोडफोड झाली, असंही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

कहाणी एका शिक्षकाची! हृदय पिळवटून टाकणारी !

‘अमिताभ आणि रेखा यांच्यात…’, ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी उघड केलं सत्य, ‘रात्री घरी जाऊन…’

‘आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे… ‘सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर NASAने व्यक्त केल्या भावना