मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका महिलेला समुद्राच्या किनारी (Seaside)चालताना पाय घसरून समुद्रात पडल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे, आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महिला समुद्रात पडताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जवळच असलेल्या काही तरुणांनी त्वरित समुद्रात उडी मारून महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्या महिलेची सुटका करण्यात आली आणि तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
महिलेची सुटका झाल्यानंतर तिला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने, या घटनेत ती महिला जखमी झाली नाही आणि तिची प्रकृती स्थिर आहे.
हा व्हिडिओ पाहून लोकांना समुद्राच्या किनारी चालताना अधिक सतर्क आणि काळजीपूर्वक वागण्याची आठवण झाली आहे. मरीन ड्राईव्हसारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
अक्षर-कुलदीपच्या फिरकीने इंग्लंडला पराभूत केल: भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये
पुण्यात झिकाचा तिसरा रुग्ण आढळला, एरंडवणे परिसरात चिंतेचे वातावरण
इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याआधी पावसाची हजेरी; सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा?