‘महिलांना ब्रा साईजनुसार मिळणार…’; पबच्या ‘या’ ऑफरने उडाली खळबळ

पब आणि बारमध्ये लोक मित्र आणि जवळच्या लोकांसोबत पार्टी करायला जातात, तिथे ड्रिंकची सहसा लिमिट नसते. लोक यावेळी मुक्तपणे पैसे खर्च करतात. पण ऑस्ट्रेलियातील एका पबने एक धक्कादायक ऑफर आणली. या पबने महिलांना मोफत ड्रिंक(Drink) देण्याची ऑफर दिली, पण ड्रिंकचे प्रमाण महिलांच्या ब्रा साईजवर अवलंबून असणार होते. ब्रा ची साईज जेवढी मोठी, तेवढे अधिक ड्रिंक मोफत मिळणार होते. या ऑफरमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ऑस्ट्रेलियाच्या एडिलेड शहरातील आहे. येथे असलेल्या ‘वूलशेड ऑन हिंडले’ नावाच्या पबने ही जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीवर लोकांची नजर पडताच एकच गदारोळ झाला. पबच्या नियमांनुसार, ‘A’ कप साईज ब्रा घालणाऱ्या महिलांना एक मोफत ड्रिंक(Drink), तर ‘B’ कप साईज ब्रा घालणाऱ्या महिलांना दोन ड्रिंक्स मोफत मिळणार होत्या.

यासोबतच, ‘C’ कप साईज ब्रा घालणाऱ्या महिलांना तीन ड्रिंक्स मोफत मिळणार होत्या. धक्कादायक बाब म्हणजे, आपली ब्रा साईज सिद्ध करण्यासाठी महिलांना आपली ब्रा काढून दाखवण्याची अट घालण्यात आली होती. या अटीमुळेच मोठा वाद निर्माण झाला. जेव्हा या पबचे ग्राहक तिथे पोहोचले तेव्हा त्यांना अनेक बोर्ड आणि पत्रकांवर ही ऑफर लिहिलेली दिसली. त्यांनी याचा कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. अखेर ही जाहिरात हटवण्यात आली आणि पबकडून ही ऑफर मागे घेण्यात आली.

दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टनुसार, पबने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माफी मागितली आणि लिहिले की, “आमच्या क्लबने शेअर केलेल्या एका अलिकडील पोस्टमुळे निर्माण झालेल्या चिंतांचे आम्ही निराकरण करू इच्छितो. आमच्या त्या पोस्टमुळे काही लोकांना अस्वस्थ आणि लज्जास्पद वाटले, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

माफी मागण्यापूर्वी पबने सोशल मीडियावर या ऑफरची जोरदार जाहिरात केली होती. पबने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर करून ‘द बिग, द बेटर’ अर्थात ‘जेवढे मोठे, तेवढे चांगले’ अशी टॅगलाइनही दिली होती. “ब्रा घालणे खूप अस्वस्थ करणारे आहे, म्हणून ती शेडमध्ये लटकवा आणि मोकळ्या व्हा”, असेही या पोस्टमध्ये लिहिले होते. या जाहिरातीवर चौफेर टीका झाली आहे.

हेही वाचा :

काय आहे आजचे सोन्या-चांदीचे भाव! वाचून तुम्हीही व्हाल आनंदीत

ट्रम्प यांचा भारताला धक्का! पहिलं विमान भारताकडे रवाना; अवैध प्रवाशांची रवानगी

“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य