वूमन्स आशिया कप 2024: इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामना कुठे पाहता येणार?

वूमन्स (woman) आशिया कप 2024 स्पर्धेला 19 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. या स्पर्धेत दोन कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे, तर पाकिस्तानची सूत्र निदा डार सांभाळणार आहे. या महामुकाबल्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. चला, या सामन्याशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स (woman) इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. वूमन्स इंडिया विरुद्ध वूमन्स पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी वूमन्स टीम इंडिया:

हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार) ,शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकार, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजाना संजीवन

वूमन्स पाकिस्तान क्रिकेट टीम:

निदा डार (कॅप्टन), आलिया रियाज, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नजीहा अल्वी,

वूमन्स इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा महामुकाबला निश्चितच रोमांचक ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी हा एक अप्रतिम अनुभव असेल.

हेही वाचा :

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप कोसळून ७ ठार

इचलकरंजीच्या विकासाला भरारी! २० कोटींच्या निधीमुळे पायाभूत सुविधांना चालन

फिजिकल अफेअरपेक्षा इमोशनल अफेअर जास्त घातक…