केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहे. केंद्रा (schemes)सोबतच अनेक राज्य सरकारनेदेखील मुलींसाठी काही खास योजना राबवल्या आहे. अशीच एक योजना म्हणजे लाडली लक्ष्मी योजना. लाडली लक्ष्मी योजनेत मुलींना १ लाख ४३ हजार रुपये दिले जातात. या योजनेत वेगवेगळ्या काळात हे पैसे दिले जातात. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये दिले जातात.मध्य प्रदेश सरकारने लाडली लक्ष्मी योजना राबवली आहे.या योजनेत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार करते.

मध्य प्रदेश सरकारने २००७ साली ही योजना सुरु केली होती. मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसेच मुलींचा जन्मस्तर वाढावा, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत १ लाख ४३ हजार रुपये दिले जातात. परंतु वेगवेगळ्या इयत्तेत गेल्यावर मुलीला हे पैसे दिले जातात.
लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. मुलगी सहावीत गेल्यावर २००० रुपये दिले जातात. मुलगी नववीत गेल्यावर तिला ४००० रुपये दिले जातात. (schemes)त्यानंतर अकरावीत म्हणजेच कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी ६००० रुपये दिले जातात. यानंतर तुमची मुलगी १२वीत असेल तर ६००० रुपये दिले जातात. जेणेकरुन तिला शिक्षण घेण्यासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये.
या योजनेत मुलगी जर १२वीनंतर कोणत्याही व्यावसायिक कोर्समध्ये प्रवेश घेत असेल तर २५००० रुपये दिले जातात. जेणेकरुन मुलीच्या उच्च शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये. या योजनेत तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये दिले जातात. या योजनेत (schemes)तुम्ही मुलींच्या नावावर खाते उघडू शकात.यासाठी तुम्हाला https://ladlilaxmi.mp.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज करताना बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड, फोटो असणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
‘एफआरपी’चा निर्णय! सरकारने सांगितलं पण शिंदेंना खटकलं, नेमकं काय घडलं?
Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम
सलमान खानचा सिकंदर प्रदर्शनासाठी सज्ज, पहिल्याच दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता