कुस्तीपटू विजय चौधरीला पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

कुस्तीचा आखाडा गाजवणारा(International) आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलिसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलिस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस अधीक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : कुस्तीचा आखाडा गाजवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विजय नथ्थू चौधरी आता पोलिसांचे क्षेत्रही गाजवतोय. अप्पर पोलिस अधीक्षक पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस (International)अधीक्षक असलेल्या विजयला कुस्तीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह’ जाहीर करण्यात आले आहे.

राज्य पोलिस विभागात विविध पदांवर कार्यरत असून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान पोलिसांना महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदविणाऱ्या विजय चौधरीने महाराष्ट्र पोलिस दलात दोन वेळा सुवर्ण पदक जिंकले. तसेच २०२३ साली कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावले होते.

भविष्यातील मोठ्या कुस्ती स्पर्धा, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव असेच उंचाविण्यासाठी मी अथक परिश्रम घेणार असल्याचे विजय चौधरीने सांगितले. सध्या विजय चौधरी आपले गुरू हिंदकेसरी रोहित पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! तब्बल ६ गावांचा मतदानावर बहिस्कार; काय आहे कारण?

कारवाईची सही करणाऱ्याने विचार करावा…, विशाल पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?

शिंदे सेनेला शरद पवारांचा दे धक्का, शिवसेनेचे माजी आमदार हाती घेणार तुतारी