कमांडो’ चित्रपटातील अभिनेता(Actor) विद्युत जामवाल त्याच्या भयानक स्टंट्ससाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याचा अलीकडचा चित्रपट ‘क्रॅक’ रिलीज झाला होता, ज्यामध्ये तो मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत अर्जुन रामपाल देखील होता. परंतु सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सर्वांचा लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक चकित झाले आणि या ॲक्शन स्टारच्या साहसाचे कौतुकही करण्यात आले.

व्हिडीओमध्ये (Actor)विद्युत जामवाल एका स्टेजवर बसलेला दिसतो. जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तसतसे तो एक धाडसी स्टंट करतो, जो पाहून प्रत्येकाचे हृदयाचे ठोके क्षणभर थांबतील. तो त्याच्या चेहऱ्यावर वितळलेली मेणबत्ती ओतताना दिसत आहे. या स्टंटला पाहून अनेकांना धक्का बसला असेल. यानंतर विद्युत डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि चाकूने मेणबत्तीवर निशाणा साधतो. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया मिळत आहेत.
व्हिडीओ शेअर करतांना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘विद्युत जामवाल, अप्रतिम ॲक्शन हिरोने सगळ्यांचे मन जिंकले आहे. खूप प्रेम आणि आदर.’ या व्हिडीओवर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘अप्रतिम कामगिरी.’ दुसऱ्या नेटकऱ्याने त्याला ‘लिजेंड’ अशी उपमा दिली, तर इतरांनी विद्युत जामवालच्या साहसाचे भरभरून कौतुक केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ हा चित्रपट यावर्षी रिलीज झाला होता. हा चित्रपट 45 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. ‘क्रॅक’ फक्त 17 कोटींची कमाई करू शकला, जे त्याच्या बजेटच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. या अपयशामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. याची एक आश्चर्यकारक बाब म्हणजे, विद्युत जामवालनेच या चित्रपटाची निर्मिती केली होती.
विद्युत जामवालच्या वर्क फ्रंटवर आगामी प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. त्याच्या भविष्यातील चित्रपटांमध्ये त्याच्या फॅन्सला आणखी दमदार ॲक्शन पाहायला मिळणार अशी आशा आहे.
हेही वाचा :
विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात
अटल बिहारी वाजपेयींची 100 वी जयंती: किती संपत्ती सोडून गेले?
2024 मध्ये भारतीय प्रवाशांची आवड: OYO च्या रिपोर्टमधून समोर आले चकित करणारे ठिकाण