माझ्या नादी लागला तर याद राख, अजितदादांचा लंकेंना सज्जड इशारा

अहमदनगर : ‘गडी दिसतो बारीक पण लई पोहोचलेला आहे. (warning)साधा माणूस, गरीब माणूस म्हणत पुढे आला. पण नंतर एक एक लक्षणं दिसायला लागली. लोकांना मदत करीत असल्याचे सांगून व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांना दमबाजी करतो. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर पहा. माझ्या नादी लागू नको. मी एखाद्याच्या मागे लागलो तर पुरता बंदोबस्त करतो,’ असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना दिला. ‘सुरवातीला तुमच्या पैकीच काही जण माझ्याकडे शिफारस घेऊन आले होते. आता तुम्हीच लक्षात ठेवा या निवडणुकीत लंकेंचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा,’ असे आवाहनही पवार यांनी केले. वरून कोसळणारा पाऊस आणि त्यामुळे विस्कळीत झालेल्या सभेत आपल्या खास शैलीत बरसणारे पवार असे चित्र आज दुपारी पारनेरमध्ये पहायला मिळाले.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी पवार यांची पारनेरमध्ये सभा झाली. ही सभा होणार की नाही, याकडे लक्ष लागले होते. त्यातच कर्जतची सभा आटोपून येईपर्यंत पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे सभा मंडप विस्कळीत झाला. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या पवार यांचे भर पावसातच भाषण झाले.

याची शिफारस तुम्हीच घेऊन आला होतात…

अजित पवार म्हणाले, ‘या तालुक्यातील पतसंस्था कोणी अडचणीत आणल्या, येथील कारखाना कोणामुळे बंद पडला, इतर संस्था कशा अडचणीत आल्या हे सर्वांना माहिती आहे. मी चांगली घडी बसविली होती. मात्र मधल्या काळात ती विस्कटली. ज्यांनी कोणी हे काम केले, त्यांचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण पुन्हा नव्याने सुरूवात करू. त्यासाठी लोकप्रतिनिधी चांगला निवडला पाहिजे. त्यावेळी माझीही चूक झाली. मात्र, माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. शिवाय तुम्ही मंडळीच शिफारस घेऊन आला होता. त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला. तुमच्या प्रेमाखातर मी उमेदवार दिला. आपण निवडून आणला. गडी दिसतो बारीक पण लई पोहोचलेला आहे. साधा माणूस, साध्या घरात राहणारा कार्यकर्ता असे सांगितले गेले. मात्र, पुढे एक एक लक्षण दिसायला लागले. आम्ही मोठ्या पदावर असूनही अधिकाऱ्यांशी सन्मानपूर्वक बोलतो. मात्र, इथे दमबाजीची भाषा होऊ लागली. अधिकाऱ्यांना अरेतुरे बोलणे, त्यांचा बाप काढणे, गरीबांना मदत करायची म्हणून व्यावसायिकांना दमबाजी करणे असे प्रकार सुरू झाले. असा त्रास खपवून घेतला जाणार नाही. मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. एकदा मी मागे लागलो तर पुरता बंदोबस्त करतो.
दादा, मी दररोज २ हजार जोर मारतो, तुमच्या पुतण्याला नीट सांगा, मंगलदास बांदलांचं रोहित पवार यांना उत्तर

अधिकाऱ्यांनो, तो आता आमदार नाही कॉमन माणूस आहे, त्याला घाबरू नका

इथल्या दमबाजीला आता घाबरू नका. आम्ही पाठीशी आहोत. (warning)अधिकाऱ्यांनाही सांगतो, तो आता आमदार नाही कॉमन माणूस आहे. त्याला घाबरण्याची गरज नाही. आपल्या कार्यकर्त्यांनींही कायदा हातात घेऊ नये. मात्र कोणी अंगावर आला तर शिंगावर घ्यायची तयारी ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या तालुक्याला आता आमदार नाही, असे समजू नका. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याकडे लक्ष घालतील. जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देतील.


सुजयला लोकसभेचा अनुभव, त्यांना प्रश्नांची जाण

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे हुशार आहेत. त्यांना प्रश्नांची जाण आहे. लोकसभेचा अनुभव आहे. आपले बरेच प्रश्न त्यांनी संसदेत मांडले आहेत. तुमच्या आमदाराने विधानसभेत काय केले, हे मला सांगायला लावू नका. ते सांगून मला विधानसभेचाही अवमान करायचा नाही. तालुक्यातील गुंडगिरीचाही आपण बंदोबस्त करू,’ असेही पवार म्हणाले.

लेखकाबद्दल