शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सातवीत शिकणार्या अल्पवयीन मुलीवर(girl) घरी ये-जा असणार्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, संशयित विजय भागवत कुंडलकर (वय 36, मूळ रा. कोकलमोहा, ता. शिरूर कासार, जि. बीड, सध्या रा. म्हाडा कॉलनी, शहापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने यासंदर्भात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

शिक्षकाकडून विश्वासघात
संशयित शिक्षक एका संस्थेत कार्यरत असून, त्याचे पीडित मुलीच्या कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून स्नेहसंबंध होते. पीडित मुलगी(girl) त्याला मामा म्हणायची. मात्र, 16 मार्च रोजी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने पीडित मुलीला जवळ बोलावून अश्लील चाळे केले व बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच, कुणाला काही सांगितल्यास जीव ठार मारण्याची धमकी दिली.
आईने घेतली पोलिसांकडे धाव
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईला मोठा धक्का बसला. तिने तातडीने शहापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दिली. पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली व गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवला. आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये संताप
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिस अधिक तपास करीत असून, न्यायालयात दोषारोप दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा :
‘गल्लीत राहायचं असेल तर एक लाख दे!’ आधी धमकी मग घरावर दगडफेक, कारही फोडली
‘लाडक्या बहिणी’चे पैसे पतीने दारुवर केले खर्च; जाब विचारताच पत्नीवर कोयत्याने वार
MI vs CSK सामन्यात मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण? रोहित शर्माच्या नावावर फुली!