कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून विशेषतः “छावा” चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इतिहासातील काही घटनांना उजाळा दिला जातो आहे. कारण नसताना जाती शोधून काढल्या जात आहेत. सामाजिक वातावरण प्रदूषित केले जात आहे. औरंगजेबाच्या क्रूरतेवर चर्चा सुरू असताना औरंगजेब हा मानवतेचा पुतळा असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) व्हायरल केले जात आहेत.

या एकूण पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील औरंग्याची कबर उखडून टाकावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून केली जात आहे तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांच्या महापराक्रमाची साक्ष म्हणून ही कबर जतन करून ठेवावी अशी भूमिका काही जण मांडत आहेत. त्यातून वातावरण तणावपूर्ण होते आहे. त्याचा झालेला उद्रेक म्हणून नागपूरच्या सोमवारी सायंकाळी झालेल्या घटनेकडे पाहिले पाहिजे.
गेल्या काही वर्षांपासून क्रूर कर्मा औरंग्याचे सोशल मीडियावर (social media) त्याचे स्टेटस ठेवून उदात्तीकरण केले जात आहे. त्यावरून कोल्हापूर सह काही जिल्ह्यात दंगली भडकल्या होत्या. अजूनही हे उदातीकरण सुरू आहे.”छावा” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंग्याची क्रूरता अतिशय दाहकपणे पुढे आली आहे.
औरंग्याची क्रोधता हा विषय बाजूला ठेवून छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारा गद्दार कोण होता याची चर्चा सुरू झाली. त्यातून प्रशांत कोरडकर यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. आणि आता एकदम औरंग्याच्या कबरी वरून वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंग्याची कबर जेसीबी लावून उखडून टाका असे आवाहन केले आणि नंतर असं काही घडेल म्हणून कबर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला(social media). आणि आता तर अयोध्या येथील बाबरी मशीद पाडण्यासाठी एक विलक्षण लढा उभा करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंग्याची कबर उध्वस्त करावी अन्यथा आम्ही ती जमीनदस्त करू अशी जहाल भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात बाबरी नंतरचा संघर्ष छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबादेत उफाळून येणार आहे. त्याची सुरुवात नागपूर शहर अशांत करण्यापासून झाली आहे. नागपूर मध्ये हा उद्रेक का झाला? कुणी केला? याचा शोध नागपूरचे पोलीस घेतील.
भिवंडी शहरात महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. या महाराष्ट्रात फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच उदात्तीकरणं होईल.
औरंग्याचे उदकतीकरण खपवून घेतले जाणार नाही. जे कुणी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल हा इशारा नागपूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सायंकाळी नागपूरच्या महाल भागात दंगल उसळते. या दोन घटनांचा परस्परांशी संबंध आहे काय? याचाही शोध घेतला पाहिजे.
हेही वाचा :
नव्या लूकसह लॉन्च झाली Honda Shine 100
31 मार्च तारीख ‘या’ 3 राशींचं नशीब पालटणारी! झटक्यात श्रीमंत होण्याचे संकेत
सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट