अलीकडे मुलींचे छेड काढण्याचे, त्यांचे लैंगिक शोषण केलेल्याच्या अनेक घटना(mobile top up) समोर येत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अशाच एका पुरूषाला महिलांनी बेदम मारले आहे. याचे कारण म्हणजे त्याने एका मुलीची छेड काढली. मुलीची छेड काढणे पुरुषाला महागात पडले. त्या व्यक्तीची परेड काढण्यात आली. महिलांनी या माणसाला फक्त मारहाणच केली नाही तर रस्त्यात त्याचा पाठलागही केला, गर्दी जमवली आणि नंतर त्याला धडा शिकवला.
हे प्रकरण राजस्थानचे असल्याचे सांगितले जात असून, यासंबंधीचा एक व्हिडिओही (mobile top up)सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनेक महिला एका पुरुषाला घेरून उभ्या आहेत, काही जण त्याला थप्पड मारत आहेत. त्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचे पाहून अनेकजण त्या ठिकाणी जमले आहेत. जमावाने त्या माणसाची परेड केली.
ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, त्याने एका मुलीचा विनयभंग केल्याचा दावाकेला जात आहे. या व्यक्तीने दुकानात रिचार्ज करण्यासाठी आलेल्या मुलीला तु फक्त आय लव्ह यू म्हण तुला फ्रिमध्ये मोबाईल रिचार्ज करून देतो. यानंतर अनेक महिलांनी मिळून या व्यक्तीला मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.तसेच अजूनही काही माणसं त्या ठिकाणी दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @priyarajputlive नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी संतापजनक प्रतिक्रीया यावर दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘आता ह्याला चांगलाच धडा मिळाला असेल, या व्यक्तीच्या आयुष्यातून I LOVE YOU हा शब्द पुसला गेला असेल.’ एकाने लिहिले की, ‘जर महिलांनी अशा लोकांना धडा शिकवायला सुरुवात केली तर गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘महिलांनी असे धाडसी असणे गरजेचे आहे.’
आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘या माणसासोबत अगदी बरोबर झाले, त्यांना अशाच प्रकारे मारले पाहिजे.’ तर चौथ्याने लिहिले की, ‘अशा लोकांसोबत असं व्हायला हवं, जोपर्यंत बदमाशांना अशा प्रकारे मारहाण होत नाही, तोपर्यंत अशा कारवाया थांबणार नाहीत आणि महिलांची सुरक्षा त्यांच्याच हातात आहे, जोपर्यंत धडा शिकवला जात नाही तोपर्यंत हे असेच होत राहील.
हेही वाचा:
टीम इंडियाला ‘जोर का झटका’, फिल्डिंग करताना कॅप्टन दुखापतग्रस्त
मद्यपी प्रवाशाची बस चालकासोबत झटापट; लालबागमध्ये 9 लोकांना उडवलं
इचलकरंजीत भाजपचा आक्रमक निषेध: छत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानावर महाविकास आघाडीला फटकारले