‘तू Hot दिसतेस, माझ्याबरोबर…’; अश्लील फोटो पाठवत अभिनेत्रीकडे मागणी!

अभिनेता(actor) दर्शन आणि त्याची अभिनेत्री पार्टनर पवित्रा गौडा यांनी चाहत्याची हत्या केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून आणखीन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हत्या झालेल्या रेणूकास्वामी नावाच्या चाहत्याने पवित्रा गौडाला मेसेज करुन सिक्रेट रिलेशनशीपमध्ये राहूयात अशी ऑफर दिली होती. रेणूकास्वामीने अभिनेत्रीला पाठवलेल्या धक्कादायक मेसेजसंदर्भात पोलिसांनीच खुलासा केला आहे.

रेणूकास्वामीने अभिनेत्रीला(actor) वाईट हेतूने मेसेज पाठवल्याचं मेसेजवरुन समोर येत आहे. “तू हॉट आहेस. हाय, प्लीज तुझा नंबर पाठव. तुला मी काय दाखवू? मी तुला फोटो पाठवू का? वा काय सुंदर दिसतेस. तू माझ्याबरोबर सिक्रेट लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहशील का? मी तुला दर महिन्याला 10 हजार रुपये देईन,” असे मेसेज रेणूकास्वामीने अभिनेत्रीला केल्याचा दावा पोलिसांना दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला आहे. पोलिसांनी कन्नड सुपरस्टार दर्शन आणि त्याची पार्टनर पवित्रा गौडाविरुद्ध कोर्टासमोर तब्बल 3991 पानांची चार्जशीट दाखल केली आहे.

चार्जशीटमध्ये रेणूकास्वामीचे अश्लील मेसेज तसेच त्याने पाठवलेल्या गुप्तांगाच्या फोटोंमुळे अभिनेत्री पवित्रा गौडा वैतागली होती. तिला हे सारं कसं हाताळावं हे समजत नव्हतं. या साऱ्यामध्ये लक्ष घालण्याची मागणी तिने याच प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या पवनकडे केली होती. त्यानंतर पवनने पवित्रा गौडा असल्याचं भासवून रेणूस्वामीबरोबर ऑनलाइन माध्यमातून संवाद साधण्यास सुरुवात केली. अगदी प्रेमाने बोलत पवनने रेणूकास्वामीकडून तो काम करत असलेल्या औषधाच्या दुकानांबाहेरील फोटो पाठवण्याची मागणी केली. रेणूकास्वामी नेमका कुठे काम करतो हे शोधून काढण्यासाठी पवनने हा मार्ग वापरला.

रेणूकास्वामी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण 65 जणांना अटक केली आहे. आता पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतर दर्शनचे वकील जामीनासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेले जबाब पाहता अभिनेत्याचा जामीन मिळणार नाही अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

ज्या ठिकाणी रेणूकास्वामीला ठेवण्यात आलेलं तिथे नोकरीस असलेल्या वॉचमनने अभिनेता(actor) दर्शनबरोबरच पवित्राला ओळखलं आहे. ज्या रात्री रेणूकास्वामीची हत्या करण्यात आली त्या वेळी हे दोघेही तिथेच असल्याचं या वॉचममने सांगितलं. तसा जबाब त्याने पोलिसांकडे नोंदवला आहे. याच ठिकाणी काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनीही असाच जबाब नोंदवला असून ते या प्रकरणातील अन्य दोन प्रत्यक्षदर्शी आहेत. रेणूकास्वामीचा छळ करुन त्याची हत्या करण्यात आल्याचं या दोघांनीह म्हटलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने रेणूकास्वामीच्या छातीवर लाथा मारल्या. यामुळेच रेणूकास्वामीच्या बरगड्या तुटल्या. त्यानंतर दर्शनने रेणूकास्वामीला उचलून ट्रकमध्ये फेकलं. यामुळे रेणूकास्वामीच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर रेणूकास्वामीने पवित्राला पाठवलेले त्याच्या गुप्तांगाचे फोटो दाखवत दर्शनने त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्या. यामुळे रेणूकास्वामी बेशुद्ध पडला. दर्शनने केलेल्या या मारहाणीमुळेच रेणूकास्वामीचा मृत्यू झाला. हा दावा करताना पोलिसांनी फॉरेन्सिक अहवालांचाही आधार घेतला आहे.

या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये दर्शन आणि पवित्रा हे दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रेणूकास्वामीची हत्या केल्यानंतर दर्शन चिंताग्रस्त होऊन हत्येमध्ये मदत करणाऱ्यांनी मैसूर शहरामधील हॉटेलमध्ये चर्चा करतानाचे फोटो पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कोर्टासमोर सादर केलेत.

हेही वाचा:

“दक्षिणा” यण! “उत्तरा” यण!

गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!

‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार