तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. तुम्ही कोणाला धमक्या देत आहात. मी कोणाच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. कुणाला जेलची भाषा बोलताय , तुम्ही एकनाथ शिंदेंना(politics) हलक्यात घेतलं. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी डिवचलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दापोलीतील प्रचार सभेत बोलत होते. (politics)शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी दापोलीत सभा घेतली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय.

दापोलीची जमीन ही पवित्र आणि संपन्न आहे, याच भूमीत बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभा आहे. योगेश कदम यांचा विजय पक्का आहे . 23 तारखेला गुलाल उधळायचा दिवाळी साजरी करायची आहे.

दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे आपल्या सरकारने येथे केले आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते तर निधी मिळणार कुठून, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत १० दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं शिंदे म्हणालेत.

हेही वाचा :

सुनीता विल्यम्सचा जीव धोक्यात

भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल

अजित पवार यांना पाडण्याचं आवाहन करणार का, शरद पवार म्हणाले, अजून बारामतीत गेलो नाही!