मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. याच पार्श्वभूमीवर Yamaha Motors ने ग्राहकांसाठी खास गुढीपाडवा ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जर तुम्हीही या सणाच्या निमित्ताने नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खास ठरू शकते.यामाहाच्या या गुढीपाडवा ऑफरमध्ये कॅशबॅकपासून ते कमी डाऊनपेमेंटपर्यंत अनेक फायदे मिळणार आहेत. कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त ग्राहकांनी सणाच्या दिवशी आपली स्वप्नातील गाडी घरी न्यावी.

FZ आणि Fascino स्कूटरवर खास सवलत :
यामाहा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मॉडेल्सवर खास ऑफर दिल्या आहेत. FZ-S Fi आणि FZ-X 149cc या मोटरसायकल्सवर ग्राहकांना ₹4,000 पर्यंत कॅशबॅक आणि केवळ ₹11,111 डाऊनपेमेंटमध्ये गाडी खरेदी करण्याची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर, Fascino 125 Fi Hybrid 125cc स्कूटरवर ₹3,000 कॅशबॅक आणि केवळ ₹6,999 डाऊनपेमेंट मध्ये स्कूटर खरेदी करता येणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून याचा लाभ घेण्यासाठी जवळच्या यामाहा डीलरशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Gudi Padwa Offer l यामाहा कडून ग्राहकांसाठी सणाची भेट :
गुढीपाडव्याच्या निमित्ताने यामाहा मोटर्सने आपल्या ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक कुटुंबात सणाच्या दिवशी नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा आहे. ही संधी साधून नवीन बाईक किंवा स्कूटर घेण्याची ही योग्य वेळ आहे.डिस्काउंटबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत यामाहा डीलरशी संपर्क करावा. काही ठिकाणी ही ऑफर किमान कागदपत्रांच्या आधारे त्वरित मंजूर कर्जासहही उपलब्ध आहे.

मार्केटमध्ये यामाहाची विविध मॉडेल्स :
भारतीय बाजारात यामाहाच्या YZF-R15 V4, MT-15 V2, Aerox 155, Fascino 125 Fi Hybrid, RayZR 125 Fi Hybrid यासारख्या अनेक बाईक्स आणि स्कूटर्सना चांगली मागणी आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिन, आकर्षक लुक आणि आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या दमदार बाईक किंवा स्टायलिश स्कूटरसोबत करायची असेल, तर Yamaha ची ही गुढीपाडवा ऑफर नक्कीच चुकवू नका.
हेही वाचा :
51 वर्षांची मलायका अरोराच्या लूकनं नाही तर पोटावर सगळ्यांच्या नजरा
सिनेस्टाईल अपहरण प्रकरणी मोठी अपडेट नवऱ्याने बायकोसोबत भयकंर कृत्य का केलं
सासऱ्याला सूनेच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं त्यानंतर दोघांमध्ये शेतात जे घडलं