नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून तरूणाचा अधिकाऱ्यावर हल्ला

नोकरीवरून कमी केल्याचा राग(anger issues) मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब हरी पवार (वय ५२, मूळ रा. ढोलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार (anger issues)अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे.

माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात अमोल पाटील हा नोकरीवर होता. परंतु कर्तव्य कचराईमुळे आणि असमाधानकारक कामामुळे त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यास नोकरीवरून कमी करण्यात आले होते.

त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातूनच रागापोटी त्याने गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यात घुसून त्यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकडही त्याने बळजबरीने काढून घेतली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुम्ही पुन्हा मला कामावर घेतले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करतात तेच बघतो, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा :

शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्…; 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार

प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय?

२०२५ मध्ये या राशी होणार मालामाल…