सोशल मीडियावर सध्या एका मन विचलित करणाऱ्या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही फॅक्स्ट्रीमध्ये काम करताना विशेष सावधानता बाळगणे फार गरजचे असते. (chinese)फॅक्स्ट्रीमध्ये अपघाताच्या अनेक घडत असतात.
आपल्या जीव धोक्यात टाकून लोक इथे काम करत असतात. अशात फॅक्स्ट्रीमधील अशाच एका दुर्दैवी आणि भीषण अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचा थरार पाहून आता अनेकांना जागीच धडकी भरली आहे.
सदर घटना मुंबईतील एका चायनीज(chinese) पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीत घडून आली. विशेष म्हणजे, अपघाताला बळी पडलेला हा तरुण केवळ 19 वर्षांचा होता, त्याचे नाव सुरज यादव असे होते. माहितीनुसार, ही घटना 14 डिसेंबर रोजी घडून आली मात्र त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. फॅक्स्ट्रीतील सीसीटीव्ही कॅमेरात मृत्यूचा हा थरार कैद करण्यात आला. व्हिडिओत नक्की काय घडले? चला जाणून घेऊयात.
सूरज यादव गेल्या अनेक दिवसांपासून या फॅक्टरीत काम करत होता. व्हायरल व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर दिसते की, सूरज यादव हा चायनीज मंचुरियन ग्राइंडरमध्ये मंचुरियनसाठी लागणारे पदार्थ ग्राइंडरमध्ये टाकत होता. यावेळी त्याचे लक्ष नसताना अचानक त्याचा शर्ट ग्राइंडरमध्ये अडकतो आणि यानंतर नको तेच घडून बसते. क्षणार्धातच तो लक्षणीयरीत्या वेगात ग्राइंडरमध्ये खेचला जातो. पुढच्या काही क्षणातच तो ग्राइंडरच्या आतमध्ये ओढला गेला आणि यात चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अक्षरशः ग्राइंडर मशीन तोडून सूरजचा मृतदेह यातून बाहेर काढला. सूरज यादव याचा हाकनाक बळी गेल्यामुळे या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
मुंबईतील घटना , चायनीज पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये पकोड्याच्या ग्राइंडरजवळ अडकून तरुणाचा मृत्यू pic.twitter.com/2vRZyPCEyA
— VIRALबाबा (@viralmedia70) December 16, 2024
या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपस पोलिसांद्वारे केला जात आहे. दरम्यान या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ @viralmedia70 नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आता वेगाने अनेक वेगेवगेळ्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येत आहे.
हेही वाचा :
कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्ग प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार…
लालकृष्ण आडवाणी यांच्यावर ICU त उपचार सुरू, हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर
भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद