मुंबईमधून तामिळनाडूतील तरुणाचे (kidnapped)अपहरण करून त्याला पुन्हा तामिळनाडूला घेऊन जात असताना पुणे पोलिसांनी अपहरणकर्त्या तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. तसेच, सहा जणांच्या मुसक्या आवळळ्या असून, आर्थिक व्यवहारातून हे अपहरण करण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोहमद फर्मान मेहेरबान (वय २७), (kidnapped)अर्जुनकुमार शिवकुमार (वय २८, दोघे रा. नरुलापूर, बिजनौर, उत्तर प्रदेश), देवेंद्र सुनील अलभर (वय २५, रा. दैवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अंकित अर्जुन अडागळे (वय २५, रा. पवई, मुंबई), प्रियांक देवेंद्र राणा (वय ३३, रा. आदर्शनगर, हरिद्वार, उत्तराखंड), अविनाश दत्तात्रय कदम (वय ४३, शिक्रापूर फाटा, ता. शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक संदीपान पवार, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक चंद्रकांत बेरड आणि पथकाने ही कारवाई केली.
सुटका करण्यात आलेला तरुण मूळचा तामिळनाडूतील आहे. आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते. आरोपींनी मुंबईत नोकरीच्या आमिषाने त्याला बोलावून घेतले. मुंबईतील एका कंपनीच्या परिसरातून त्याचे अपहरण करुन सोलापूर रस्त्यावरील एका लाॅजमध्ये त्याला डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण केली.
तरुणाच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तीन लाख रुपयांची खंडणी मागितली. कुटुंबीयांनी आरोपींना तीन लाख रुपये पाठविले. त्यानंतर आरोपींनी त्याला डांबून ठेऊन मारहाण केली होती. त्याच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार पुणे पोलिसांकडे दिली. नंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींना सोलापूर रस्त्यावरील एका लॉजमधून अटक केली. त्यांच्या तावडीतून तरुणाची सुटका केली.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
हेही वाचा :
चार्जिंगदरम्यान मोबाईलचा स्फोट! दुकानदाराच्या चेहऱ्यावर आदळले ज्वलंत तुकडे; थरारक Video Viral
WhatsApp वरील स्पॅम कॉल्समुळे हैराण झालात? लगेच अॅपमध्ये करा ही महत्त्वाची सेटिंग
ठाकरे-फडणवीसांच्या भेटींवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले, “सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने कधी पाहिले नाही!”