अजगराला किस करण्याची चूक तरुणाला पडते महागात, Video Viral

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. मात्र सध्या जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यातील दृश्ये तुम्हाला भयभीत करून सोडतील. यात एक भलामोठा अजगर एका व्यक्तीचा चक्क चावा घेताना दिसून येत आहे. व्हिडिओतील हा थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती हातात अजगर घेऊन उभा आहे. असे दिसते की त्याला अजगरासोबत स्वतःचा एक व्हिडिओ शूट करायचा आहे, जेणेकरून तो लोकांना दाखवू शकेल की त्याने अजगरावर किती सहजपणे नियंत्रण ठेवले आहे.

मात्र त्याने विचार केला असावा तसे यात काहीच घडले नाही तर घडलं काही भलतंच. व्हिडिओत पुढे जे घडते ते अनेकांना आश्चर्य देऊन जाते. अजगाराशी मजा करणे व्यक्तीला फार महागात पडते. अजगर व्यक्तीला असा इंगा दाखवतो, व्यक्ती आयुष्यभर ही मजा लक्षात ठेवेल. व्हिडिओत नक्की काय घडते ते जाणून घेऊयात.

तर कॅमेरा चालू होताच ती व्यक्ती अजगराचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करते, मात्र अजगराची त्यावर वेगळीच प्रतिक्रिया असते. तो माणूस अजगराच्या जवळ पोहोचताच अजगर अचानक त्याचे तोंड पकडून त्याचा पूर्णपणे गळा दाबतो. या अनपेक्षित घटनेने त्या व्यक्तीला पूर्ण धक्का बसतो. तो माणूस अचानक खूप घाबरून जातो, कारण अजगर अशी प्रतिक्रिया देईल असा विचारही त्याने केला नव्हता.

अजगराने त्याला पूर्णपणे पकडून त्याच्या तोंडाजवळ त्याच्यावर वार केले. हे दृश्य प्रेक्षकांसाठी खूपच भितीदायक ठरले कारण अजगराचा हल्ला खूप वेगवान आणि शक्तिशाली होता. त्या माणसाला अजगरापासून कसे सुटावे हे समजले नाही आणि त्याने कसा तरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेत तो अजगराच्या धोकादायक प्रभावापासून वाचण्यासाठी धडपडताना दिसून आले.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना ते पाहून आश्चर्य वाटले. व्हिडिओमध्ये एकीकडे अजगराचे धोकादायक रूप दिसत होते, तर दुसरीकडे त्या व्यक्तीची भीती आणि अस्वस्थताही स्पष्टपणे दिसत होती. हा व्हायरल @viral_ka_tadka नावाने इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आणि मजा घे, अजगराशी खेळणं महागात पडलं’ असं लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत.

हेही वाचा :

CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप

इचलकरंजी : पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था; धोकादायक वळणावर ट्रक पलटी

‘हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,’ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला… Video Viral