अमरावती : जुन्या बायपासवरील दस्तुरनगर रोड स्थित प्रभादेवी मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी (दि. 22) एका तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या(death) करण्यात आली. अब्दुल आकीब अब्दुल वहाब (22, रा. नालसाहबपुरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. मृताच्या नातेवाईकांसह त्याच्या मित्रमंडळींनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. याप्रकरणात तीन आरोपींचा सहभाग असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
एमआयडीसीकडे जाणाऱ्या जुन्या बायपासवरील होटल लार्डस समोर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह(death) जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. पोलिसांनी मृताची ओळख पटवून तपासकार्य सुरु केले. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींचे शोध कार्य सुरु केले.
या घटनेच्या माहितीवरून डीसीपी गणेश शिंदे, नागपुरी गेट, सीटी कोतवाली व काईमचे पीआय आपल्या पथकासह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी इर्विनमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न चालविले. या घटनेनंतर रात्री 11 वाजता घटना नागपुरी गेट हद्दीतील दुकाने बंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. 23 नोव्हेबर रोजी सायंकाळपर्यंत अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते.
अब्दुल आकीब अब्दुल वहाब याची हत्या झाल्याची माहिती मिळताच, त्याची आईसह अन्य नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. अब्दुल आकीबचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. यावेळी त्याच्या आईने सांगतले की, एका मुलीच्या कुटुंबीयातील सदस्यानेच हे कृत्य केले आहे.
अब्दुल आकिबची हत्या केली. दरम्यान तेथे उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार, अब्दुल आकीबची एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, काही कारणास्तव पुढे हे नातं जाऊ शकले नाही. त्यानंतर यावरून दोन्ही कुटुंबाचे वाद सुरु होते. चार ते पाच दिवसांपासून मुलीच्या भावाकडून अब्दुल आकीबला धमक्या मिळत होत्या, असे त्याची आई सांगत होती.
हेही वाचा :
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच घेणार सप्तपदी…
निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का