मृत्यूपश्चातही सुरक्षित राहतील तुमचे Facebook-Instagram डिटेल्स, आजच करा ही सेटिंग !

फेसबुक आणि इंस्टाग्राम (Instagram)हे सोशल मेडिया प्लॅटफॉर्म सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. तुम्हीही यावर आपले अकाउंट ओपन केले असेलच.

अशातच मृत्यूनंतर फेसबुक आणि(Instagram) इंस्टाग्रामवरील तुमची पर्सनल माहिती कशी सुरक्षित राहील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या डिजिटल वारशाचा गैरवापर होण्यापासून कसा रोखायचा? मात्र आता तुम्हाला या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही.

आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या Facebook आणि Instagram अकाउंटवर तुमची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवू शकता. मेटा किंवा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरात लाखो युजर्स आहेत, परंतु मेटा त्यांची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवते.

फेसबुक किंवा इन्स्टाग्राम युजरचा मृत्यू झाल्याचे आपोआप कळणार नाही. जर तुम्हाला मृत्यूनंतर एखाद्याचे अकाउंट डिलीट असेल किंवा मेमोरियल अकाउंट तयार करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही सेटीइंग्स कराव्या लागतील. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून हे सहज करू शकता.

फेसबुक किंवा इंस्टाग्राम तुमचे अकाउंट इतर कोणीतरी विनंती केल्याशिवाय ते निष्क्रिय करणार नाही किंवा हटवणार नाही. फेसबुकच्या मेमोरिअलाइज्ड प्रोफाईल (Memorialized Profile) मध्ये तुमच्या नावासोबत रिमेमरिंग लिहिले जाईल. तुमचे मित्र तुमच्या प्रोफाइलवर त्यांच्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करू शकतात.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम प्रोफाईलवर जावे लागेल
यानंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि सेटिंग्ज (Settings) आणि प्रायव्हसी (Privacy) वर टॅप करा
त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज पर्यायावर टॅप करावे लागेल
येथे तुम्हाला अकाउंट सेंटर दिसेल. त्यावर टॅप करून पर्सनल डिटेल्सवर जा
येथे खाते मालकी आणि नियंत्रण वर जा आणि मेमोरिलायझेशन (Memorialization) वर टॅप करा
त्यानंतर मेमोरिअलाइज अकाउंट (Memorialize account) किंवा डिलीट आफ्टर डेथ (Delete After Death) वर टॅप करा
नंतर नेक्स्ट वर जा आणि कन्फर्म करा

लक्षात ठेवा की कोणत्याही युजर्सच्या अकाउंटसाठी मेमोरियलाइज्ड किंवा डिलीट आफ्टर डेथ पर्याय निवडल्यानंतर, ते रद्द केले जाऊ शकत नाही. ते अकाउंट एकतर कायमचे मेमोरियल अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाईल किंवा ते कायमचे हटवले जाईल.

हेही वाचा :

रविवार होईल आणखीन स्पेशल! सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘एग सँडविच’

‘या’ 3 राशींचं उजळणार भाग्य, लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

‘ते सोबत नाही आले तर आमचाही मार्ग मोकळा’; काँग्रेसचेही स्वबळाचे संकेत