कोल्हापुरात युवकास अटक, 5 लाख 30 हजार रुपयांच्या 11 दुचाकी जप्त

कोल्हापुरातील(bike shorts) मार्केट यार्ड परिसरातून एका आंतरराज्य मोटरसायकल चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रमेश रवींद्र माने असे संशयित आराेपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

कोल्हापूर(bike shorts) शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेण्याची सूचना सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने तपास करताना शाहूपुरी पोलिसांना एक आंतरराज्य मोटरसायकल चोरटा मार्केट यार्ड परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

पाेलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मार्केट यार्ड परिसरातून आंतरराज्य मोटरसायकल चोरटयाला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर म्हणाले संशयित आराेपीचे नाव रमेश रवींद्र माने असे आहे. तो निपाणी तालुक्यातील पडलीहाळ येथील रहिवासी आहे.

त्याच्याकडून विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 5 लाख 30 हजार रुपये किमतीच्या चोरीच्या 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे, संदीप जाधव, मिलिंद बांगर,महेश पाटील, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, बाबा ढाकणे, रवी आंबेकर, लखन पाटील सत्याजीत भाट, विकास चौगले यांनी केली.

हेही वाचा :

मुंबई लोकलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीसमोर उभा ठाकला विचित्र प्रसंग

कागलमध्ये विधानसभेचं वारं; महायुतीतच ‘बिग फाईट’, घाटगे-मुश्रीफ लागले कामाला…

इचलकरंजीमध्ये नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले