पुणे : दांडीया खेळताना धक्का लागल्यानंतर झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार(Attacked) केल्याची घटना घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. आठ जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली आहे. आनंद देवेंद्र मांगले (वय ४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत मांगले यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्व रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बी. टी. कवडे रस्त्यावर शिव मित्र मंडळाने दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा वादातून राजवर्धन नुगला व मारुती गवंडी, ऋषीकेश गवंडी यांच्यात दांडिया खेळत असताना वाद झाले. वादानंतर त्यांनी राजवर्धन याला मारहाण(Attacked) करण्यास सुरूवात केली. तेव्हा आनंद मांगले यांनी भांडणात मध्यस्थी केली. यावरुन आरोपींनी मांगले यांच्यावर कोयत्याने वार केले. अधिक तपास सहायक निरीक्षक अण्णासाहेब टापरे करत आहेत.
हेही वाचा:
वृद्ध जोडप्याची अप्रतिम जुगलबंदी; खेळला असा दांडिया की लोक पाहतच राहिले
नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट
लग्नानंतर तीन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस लेकीला दिला जन्म