झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2025 चा 20 वा सामना(match) पार पडला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा 12 धावांनी पराभव करून सीजनमधील तिसरा सामना जिंकला. विराट कोहलीची आरसीबी होम टीम विरुद्ध सामना खेळणार असल्याने मोठ्या संख्येने फॅन्स सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचले होते.

या सामन्याची(match) तिकीटं आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सोल्ड आउट झाली होती. मुंबई विरुद्ध आरसीबी सामना पाहण्यासाठी आलेला मराठी बिगबॉस विजेता सुरज चव्हाण आणि स्टार क्रिकेटर विराट कोहली हे समोरासमोर आले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बिगबॉस मराठी सीजन 5 चा विजेता आणि रील स्टार सुरज चव्हाण याने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले, ‘किंग कोहली आणि तुमचा टॉपचा किंग समोरा समोर आहोत. पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या वानखेडे स्टेडियम वर मॅच बघायला गेलो आणि आपल्या भारत देशाचा विराट भाऊ जवळून दिसला…! बाकी स्टेडियम मधे झापुक झुपूक खऊन वाजलय वीडियो उद्या सोडतो’.

सुरज चव्हाण याचा आगामी ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्या प्रमोशनसाठी सध्या सूरज महाराष्ट्र भर फिरतोय. या चित्रपटाची गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतारतायत. व्हिडीओमध्ये दिसल्या प्रमाणे सुरज चव्हाण हा MI फॅनक्लबच्या स्टॅन्डमध्ये होता. त्यावेळी विराट कोहली त्याच्या अगदी समोर मैदानात बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता. विराटने त्याला पाहून हात सुद्धा दाखवला. गोलीगत किंग आणि क्रिकेटचा किंग कोहली यांना आमने सामने पाहून सुरजचे फॅन्स आनंदीत झाले.

‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सूरज चव्हाण या चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.

‘Excuse me’ बोलण्याचा संताप, मराठी बोला सांगत तरुणीला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार