राज्यात चौथ्या टप्प्यात ५२.४९ टक्के मतदान..

महाराष्ट्रातील लोकसभा (parliament) निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. शिरूर लोकसभा (parliament) मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४३.८९ टक्के मतदान झालं तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक ६०.६० टक्के मतदान झालं.

एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

नंदुरबार – ६०.६० टक्के

जळगाव – ५१.९८ टक्के

रावेर – ५५.३६ टक्के

जालना – ५८.८५ टक्के

औरंगाबाद – ५४.०२ टक्के

मावळ – ४६.०३ टक्के

पुणे – ४४.९० टक्के

शिरूर – ४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

शिर्डी – ५२.२७ टक्के

बीड – ५८.२१ टक्के