लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहाच ज्येष्ठ अभिनेत्रीचा जोडप्यांना सल्ला माझी दोन्ही मुलांनी हेच केले

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला(dating advice) आहे. पाहा नेमकं काय म्हणाल्या झीनत आपल्या देशात अजूनही जी जोडपी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात, म्हणजेच लग्नाआधी एकत्र राहतात त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं.

मात्र आजच्या तरुणांनी लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी व्यक्त केले. ७२ वर्षीय अभिनेत्रीने असेही सांगितले की त्यांची दोन्ही मुलं लिव्ह इनमध्ये राहिली आहेत. झीनत यांनी हे करण्याची नेमकी गरज काय आणि त्यातून काय फायदा होईल हे देखील सांगितले आहे.

एका चाहत्याने नातेसंबंधाबद्दल विचारलेल्या सल्ल्याबाबत पोस्ट शेअर तर झीनत यांनी त्यांचे विचार लिहिले. इस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा पाळीव श्वान लिलीचे फोटो शेअर केलेत. आधी त्यांनी या पोस्टमधून लिलीची ओळख करुन दिली आणि त्यानंतर नातेसंबंधांबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

झीनत यांच्या मते लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे जोडप्यांना मतभेदांना सामोरे (dating advice)जाता येते. लग्नाआधी ते एकत्र राहून छोटे-मोठे वाद मिटवायला शिकतात. त्यांच्यात समन्वय वाढतो. झीनत यांनी लिहिले की, ‘तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या आधीच्या पोस्टवर कमेंट केली आणि नातेसंबंधांवर सल्ला मागितला. त्यामुळे तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर माझा सल्ला आहे की तुम्ही लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा. मी माझ्या दोन्ही मुलांना हाच सल्ला देतो. ते याआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते किंवा सध्या राहत आहेत.

त्यांनी पुढे लिहिले की, ‘दोन व्यक्तींनी त्यांच्या नात्यात कुटुंबीय आणि सरकारला सामील करुन घेण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्या नात्याची परीक्षा घेणे मला तर्कसंगत वाटते. दिवसातील काही तासांसाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनणे सोपे आहे. पण तुम्ही बाथरूम शेअर करू शकता का? खराब मूड हाताळू शकता? रात्रीच्या जेवणासाठी काय खावे यावर तुम्ही सहमत आहात का? तुम्ही बेडरूममध्ये एकमेकांशी कसे वागता? दोन लोकं इतक्या जवळ राहिल्याने त्यांच्यात होणारे छोटेमोठे हाताळू शकता का? थोडक्यात- तुम्ही सुसंगत आहात का?’

झीनत पुढे लिहितात की, ‘ मला माहीत आहे की (dating advice)भारतीय समाजात लग्नापूर्वी एकत्र राहणे पाप मानले जाते, परंतु समाज इतर अनेक गोष्टींबाबत कठोर आहे. लोक काय म्हणतील?’ झीनत यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल मत व्यक्त केले आहे.

झीनत अमानच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी १९७८ मध्ये अभिनेता संजय खानसोबत पहिले लग्न केले होते, पण वर्षभरानंतर त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर झीनत यांनी १९८५ मध्ये अभिनेता मजहर खान यांच्याशी लग्न केले. त्यांना अजान आणि जहाँ अशी दोन मुलं आहेत

हेही वाचा :

2000 कोटी रुपयांमध्ये बनवले जाणारे हे दोन साऊथ चित्रपट

फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार

राहुल गांधी यांची प्रचार सभा, व्यासपीठावर भाजप उमेदवाराचा फोटो