संजय घाटगे यांची मुश्रीफांना साथ, विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्धार

पुणे : माजी आमदार संजय घाटगे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (election)पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. घाटगे यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

“हसन मुश्रीफ हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार,” असे घाटगे म्हणाले.

या घोषणेमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म मिळण्याची शक्यता आहे. घाटगे आणि मुश्रीफ यांच्या युतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात बळ मिळणार आहे.

यावेळी घाटगे यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

नवऱ्याने भर रस्त्यात धारधार शस्त्राने बायकोवर केला हल्ला  VIDEO

इचलकरंजी-शिरदवाड मार्ग बंद! पूरग्रस्त नागरिक परतू लागले घरी

गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल