घाटकोपर छेडानगर येथे महाकाय बेकायदा होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल 70 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर संपल्याचे आज पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी जाहीर केले. या दुर्घटनेत दुर्दैवाने 16 जणांचा मृत्यू(death) झाला असून 40 जखमींवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, 120 बाय 120 फुटांपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग कोसळल्याने 100 वाहनांचा चुराडा झाला.
सोमवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळले. या वेळी पाऊस आणि वादळापासून बचाव करण्यासाठी पेट्रोल पंपावर उभे असलेले 100 जण या होर्डिंगखाली दबले गेले. या भयंकर दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल तीन दिवस अहोरात्र सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी हे काम पूर्ण झाले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मृतांच्या नातेवाईकांकडे लवकर पोहोचवण्यात येईल, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले. छेडानगर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी गगराणी यांनी गुरुवारी सकाळी भेट दिली. या वेळी उपआयुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त (विशेष) किरण दिघावकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.(death)
घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचावकार्य पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. जाहिरात फलक कापून केलेले सुटे भाग तसेच इतर राडारोडा हटवण्याचे काम सुरू आहे. हे कामदेखील आता पूर्णत्वाकडे आहे. सर्व आवश्यक कार्यवाही करून घटनास्थळ पूर्वपदावर आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
बचावकार्यात अनेक संस्थांचा सहभाग
घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनास्थळी बचावकार्यामध्ये महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड यांच्यासह विविध शासकीय व बाह्य यंत्रणांचा समावेश होता. सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय राखून बचावकार्य पूर्ण केले.
ही बातमी वाचा:
आनंदाची बातमी ! पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण
मोदी तर झोळी घेऊन निघून जातील, 4 जूननंतर तुमचं काय होणार?
‘पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा ‘टॅक्स’संदर्भात मोठा निर्णय