केरळमध्ये १४ वर्षाच्या मुलाचा दुर्मिळ (rare) अमीबा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात या मुलाचा मृत्यू झाला आहे.
केरळच्या आरोग्य विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, दूषित पाण्यात आढळलेल्या मुक्त-जिवंत अमीबामुळे १४ वर्षीच्या ‘मृदुल’चा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी खासगी रुग्णालयात या मुलावर मृत्यू ओडावला ()rare. संबंधित मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला असता, त्याला हा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.
मे २०२४ पासून केरळमध्ये अमीबा संसर्गाने झालेला हा तिसरा मृत्यू आहे. पहिली घटना २१ मे रोजी मलप्पुरममध्ये पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू आणि दुसरी घटना २५ जून रोजी कन्नूरमध्ये १३ वर्षीय मुलीचा दुर्मिळ अमीबा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, मुक्त जिवंत नॉन-परजीवी अमिबा (rare) बॅक्टेरिया दूषित पाण्यातून शरीरात प्रवेश करतात तेव्हा हा संसर्ग होतो. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना ‘अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस’बाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी २०१७ आणि २०२३ मध्ये केरळच्या किनाऱ्यावरील अलाप्पुझा जिल्ह्यात हा संसर्गजन्य आजार दिसून आला होता.
हेही वाचा :
चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात
होंडाची ‘अमेज़’ लवकरच तुमच्या भेटीला: नव्या जनरेशनसह कमालीचे सुरक्षा फीचर्स
कोल्हापुरात व्यावसायिकाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून 2.51 कोटींचा गंडा