लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे. युती(atmosphere) आणि आघाड्यांकडून प्रक्रिया वेगाने सुरु आहे. परंतु महाविकास आघाडी असो की महायुती असो दोन्ही युती आणि आघाडीत कुरघोडी सुरु आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे.
त्यासाठी वेळप्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी(atmosphere) मत मागणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांना मांडली. तसेच त्यांनी महायुतीला धक्का देत प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली. आता या सर्व प्रकरणात नवनीत राणांवर घणाघाती हल्ले ते करत आहेत. यामुळे अमरावती लोकसभेच्या निवडणुकीच वातावरण तापलं आहे.
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जत केली गेली. आपण 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची. परंतु ही 17 रूपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असा खरपूस समाचार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचा घेतला. राणांनी मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणाचा डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. आता तीर दूर गेलेला आहे. तो वापस येणार नाही, असे ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर कुणीही नाराज नाही, असे म्हटले आहे. आमचे कार्यकर्ते काहीही बोलले नाहीत. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. महायुतीचे लोक मदत करतील. महायुतीचे उमेदवार 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील. त्यांचे जात प्रमाणापत्र बरोबर आहे. कोर्टाच्या निकालात ते स्पष्ट होईल.
बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतच्या युतीत आहेत. शिंदेमार्फत त्यांचा भाजपशी संबंध आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बच्चू कडूचा तिढा सोडवा, अशी विनंती करणार आहोत. त्यानंतरही बच्चू कडू यांनी ऐकले नाही तर मतदार निर्णय घेतली.
हेही वाचा :.
ठाकरेंचा भाजपला दे धक्का…; ‘तो’ नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती
लोकल ट्रेनमध्ये १५ वर्षीय मुलीला किस करण्याचा प्रयत्न, वडिलांसह प्रवाशांनी…
देशभरात लागू झाला ‘वन व्हीकल वन फास्टॅग’ नियम; काय आहे कारण?