ठाकरेंचा भाजपला दे धक्का…; ‘तो’ नेता हाती शिवबंधन बांधणार, सूत्रांची माहिती

देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात(sources) घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संजय राऊत यांच्याशी ते प्राथमिक चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबतचा निर्णय पक्का करतील, अशी माहिती आहे.

उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे तीन पदाधिकारी(sources) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती खात्रिलायक सूत्रांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपच्या नेतृत्वाने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यामुळे सहाजिकच उन्मेष पाटील नाराज झाले. उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.

जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे तिघे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. चारही जणांपैकी एक असणारे करण पवार यांनी टीव्ही 9 शी फोनवरून बोलताना या बातमीला दुजोरा दिला.

विद्यमान खासदार यांच्यासह दोन पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात होणार असल्याची माहिती करण पवार यांनी दिलीय. एकनाथ खडसेंच्या सोबत पण आले नव्हते. तेवढे कार्यकर्ते भाजपसोडून ठाकरे गटात प्रवेश करतील. आज किंवा उद्या या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहे, असंही करण पवार यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

लोकल ट्रेनमध्ये १५ वर्षीय मुलीला किस करण्याचा प्रयत्न, वडिलांसह प्रवाशांनी…

देशभरात लागू झाला ‘वन व्हीकल वन फास्टॅग’ नियम; काय आहे कारण?

मुंबईत अग्नितांडव! नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल