देशभरात लागू झाला ‘वन व्हीकल वन फास्टॅग’ नियम; काय आहे कारण?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, म्हणजेच NHAI चा ‘एक वाहन एक फास्टॅग'(online fastag recharge) नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. यापूर्वी मार्च महिन्यात हा नियम लागू करण्यात येणार होता, मात्र केंद्राने एक महिन्याचा दिलासा देत याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली होती. 1 एप्रिलपासून मात्र हा नियम लागू झाला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या नियमामुळे आता एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग(online fastag recharge) जोडता येणार नाहीत. ज्या लोकांकडे एका वाहनाशी लिंक असलेले एकाहून अधिक फास्टॅग आहेत, त्यांचे एक सोडून इतर फास्टॅग 1 एप्रिलपासून बंद होतील. आपले इतर फास्टॅग बंद करण्यासाठी, वा त्यातील बॅलन्स ट्रान्सफर करण्यासाठी RBI आणि PPBL ने ग्राहकांना 15 मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

इलेक्ट्रिक टोल प्रणालीची कार्यक्षमता अधिक सुधारावी आणि टोल प्लाझावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणं किंवा एकाच वाहनाला अनेक फास्टॅग लिंक करणं बंद होणार आहे.

भारतातील सुमारे 98 टक्के वाहनांना फास्टॅग लिंक होऊ शकतं. सध्या देशात 8 कोटींपेक्षा अधिक फास्टॅग यूजर्स आहेत. यामध्ये रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. वाहन टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर फास्टॅग स्कॅन होऊन, वॉलेटमधून आपोआप टोलची किंमत कापली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो.

हेही वाचा :

लोकल ट्रेनमध्ये १५ वर्षीय मुलीला किस करण्याचा प्रयत्न, वडिलांसह प्रवाशांनी…

मुंबईत अग्नितांडव! नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

प्राध्यापकांकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ! इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या