कोल्हापूर : नामांकित कंपन्यांच्या नावाने ग्रुप बनवून शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली(businessman) फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. शेअर मार्केटमध्ये मागील कित्येक महिने गुंतवणूक केलेल्यांपैकी अनेकांचीही अशाप्रकारे फसवणूक सुरू आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला दोन कोटी ५१ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडियाच्या (व्हॉटसॲप) माध्यमातून ॲव्हेन्डस स्पार्क या कंपनीतून(businessman) बोलत असल्याचे सांगून फिर्यादी हरेष गोवर्धनदास चंदवाणी (वय ६२, रा. ताराबाई पार्क) यांना दोन ग्रुपला जॉईन होण्यास सांगण्यात आले होते.
यावरून बोलणाऱ्या पाच संशयितांनी १३ वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये ही रक्कम भरून घेतल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. हा प्रकार २८ एप्रिल ते २८ जून या कालावधीत घडला. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी : व्यावसायिक हरेष चंदवाणी यांना मुंबईहून ॲव्हेन्डस स्पार्क कंपनीतून बोलत असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची माहिती देण्यात आली.
नामांकित कंपन्यांच्या नावाने ग्रुप बनवून शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. शेअर मार्केटमध्ये मागील कित्येक महिने गुंतवणूक केलेल्यांपैकी अनेकांचीही अशाप्रकारे फसवणूक सुरू आहे. चंदवाणी यांची फसवणूक करणारे संशयितही नेमके कोणत्या कंपनीतून बोलत होत?, संशयितांनी सांगितलेली नावे खरी किंवा खोटी?, पैसे जमा झालेली खाती कोणाच्या नावे आहेत, याचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.
फिर्यादी चंदवाणी यांनी २८ एप्रिल ते २८ जून कालावधीत दोन कोटी ५१ लाख ३९ हजारांची रक्कम संबधित कंपनीला दिली. मात्र, यानंतर चंदवाणी यांना संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळणे बंद झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सायबर पोलिसांकडे सोपविण्यात आला.
हेही वाचा :
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?
ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकूहल्ला…
वर्ल्डकपची वरात; टीम इंडियाच्या घरात… ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित, सूर्यानं ‘असा’ धरला ठेका