56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?

सलमान खानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानने गेल्या वर्षी सेलिब्रिटी(father) मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत सरे लग्न केले. तेव्हापासून हे कपल नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अरबाज आणि शूरा एका मॅटर्निटी क्लिनिक बाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर अरबाज आणि शूरा खान लवकरच आई-वडील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अरबाझ खान हा सध्या 56 वर्षांचा आहे.

अरबाज आणि शूरा खान 2 जुलै रोजी एका मॅटर्निटी क्लिनिकच्या(father) बाहेर स्पॉट झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अरबाज खान ग्रीन टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसून आला. तर शूरा खान डेनिम शॉर्ट्ससह क्रॉप-टॉप आणि ओपन शर्टमध्ये दिसली होती. पॅप्सने मॅटर्निटी क्लिनिकमधून बाहेर पडलेल्या जोडप्याला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.

दरम्यान, एका पापाराझीने अरबाजला विचारले की काही चांगली बातमी आहे का? यावर अभिनेता-चित्रपट निर्मात्याने मौन बाळगले आणि उत्तर न देण्याचा निर्णय घेतला. तथापि, शूरा ही पॅप्सच्या प्रश्नावर काहीशी लाजली. त्यानंतर दोघेही पॅप्सकडे दुर्लक्ष करत कारमधून निघून गेले.

याआधी मंगळवारी शूरा खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती पती अरबाज खानला भेटण्यासाठी विमानतळावरील कॅफेत धावत जाताना दिसली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शूरा व्हाईट कलरच्या जॅकेटसह ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली होती. कॉफी शॉपमधून काही वेळाने शूरा तिची वाट पाहत असलेल्या अरबाज खानसोबत बाहेर येताना दिसली. त्यांनी कॅमेऱ्यासाठी पोझही दिली.

अरबाज आणि शुराची प्रेमकहाणी पाटणा शुक्ला चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. अरबाज या चित्रपटाचा निर्माता होता. तर शूरा ही रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट होती 24 डिसेंबर 2023 रोजी अरबाजची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी अरबाज आणि शुरा यांचे लग्न झाले.

हेही वाचा :

कोटीच्या दागिन्यांची चोरी टीप दिल्यानेच “सॅक” लंपास

मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी उपाय

कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय; मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक