मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर 300 युनिट वीज मोफत मिळणार, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

मोदी यांचं तिसऱ्यांदा सरकार आलं, तर मोफत 300 युनिट वीज(prepaid electricity) मिळणार, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज धाराशिवाय येथे प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये(prepaid electricity) असताना एकदा शेतकऱ्यांना वीजबिल माफी केली होती. सुशीलकुमार शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते. निवडणूक त्या मुद्द्यावर जिंकली आणि पाहिलं बिल दिलं शून्याचे. मात्र नंतर पुन्हा आधी सारखे बिल देण्यास सुरुवात झाली. म्हणाले परवडत नाही. मात्र मोदी हे कुठलंही काम करतात, ते मागील पुढील विचार करून करतात.

अजित पवार म्हणाले, ”राज्यात कार्यक्रमासाठी जेव्हा नरेंद्र मोदी येतात, त्यावेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची आम्हाला संधी मिळते. आम्ही चर्चा करतो. आता 300 युनिटपर्यंत जे वीज वापरतात, त्यांना येथून पुढे मोदींच तिसऱ्यांदा सरकार आल्यावर 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.”

हेही वाचा :

छगन भुजबळ यांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीतून माघार

कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, निवडणूक अर्ज दाखल करताच अमित शहा कडाडले