5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!

मुलाचे (kidnap)अपहरण करून 29 लाख रुपये लुटल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील कळे आणि आसगावमधील पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पाच जणांनी सावकारीमधून हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कळे येथील अशोक पाटील याच्याकडून फिर्यादी विठ्ठल पाटील यांनी फेब्रुवारी 2022 साली पाच लाख रुपये घेतले होते.

फिर्यादीने अशोक पाटील व त्याचा मुलगा अवधूतला 29 टक्के व्याजदराने एकूण 29 लाख रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात परत केले होते. मात्र, पैसे परत केल्यानंतर देखील अशोक पाटील, अवधूत पाटील व प्रल्हाद भोसले यांनी फिर्यादीच्या मुलाचे (kidnap)अपहरण करून आणखी पैशांचा तगादा लावला होता.

या प्रकरणी विठ्ठल पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. यानंतर संशयित अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी 20 टक्के व्याजदराने पैसे घेतल्याचे कबूल केले आणि 29 लाख रुपये परत देण्याचे कबूल केले.

संशयित अशोक पाटील, प्रदीप भोसले व प्रल्हाद भोसले यांनी फिर्यादीने पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जानुसार गुन्हा टाळण्यासाठी फिर्यादीच्या खात्यावर 27 लाख रुपये पाठविले होते. परंतु संशयितांनी फिर्यादींचा मुलगा पियुष याला धमकी देऊन ते परत वसूल केले.

दरम्यान, विठ्ठल आनंदा पाटील यांचे कुटुंबीय सावकाराविरोधात कारवाई होत नसल्याच्या संतापातून काही दिवसापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनानंतर कळे मधील झोपलेल्या पोलीस प्रशासनाने अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

आरारारा खतरनाक! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; बघून तुमचेही पाय लागतील थिरकायला, Video Viral

‘न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवतेय’; रोहित पवारांची सरकारवर तीव्र टीका

विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती?