कोल्हापुरात तरुणीचा खून ….आई भाऊ आणि मामाला अटक

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रेम प्रकरणातून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुण मुलीस(brother) आईने संबंधित मुलाबरोबर लग्न कर अथवा प्रेम प्रकरण सोडून दे असे सांगितले. मात्र मुलगी ऐकत नव्हती. त्यामुळे चिडलेल्या आईने मुलीस काठी व लोखंडे सळीने बेदम मारहाण केली. यामध्ये वैष्णवी पोवार (वय 24 राहणार शनिवार पेठ कोल्हापूर) हिचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी पोवार ,भाऊ श्रीधर पोवार आणि मामा संतोष अडसुळे या तिघांना अटक केली आहे.

कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरात चप्पल दुकान व्यवसायिक शुभांगी पोवार यांना दोन मुले यातील मोठी मुलगी वैष्णवी ही शिक्षण घेऊन एका खाजगी बँकेत(brother) नोकरी करत होती. तर भाऊ श्रीधर हा आपल्या आईला दुकानात मदत करत होता. 24 वर्षाच्या वैष्णवीचे पुण्यातील एका तोरणाबरोबर प्रेम संबंध होते. त्यामुळे ते लग्न न करताच लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये एकत्र राहण्यास तयार होते. मात्र आईला ते मान्य नव्हते. त्यामुळे आईने लग्न कर आणि एकत्र रहा पण अशा प्रकारे लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहणे चुकीचे आहे. लोक नाव ठेवतील ,आपल्या कुटुंबाची अब्रू जाईल, असे आई शुभांगी वैष्णवीला सांगत होती. मात्र वैष्णवी आईचे काहीच ऐकत नव्हती.

संतप्त शुभांगी पोवार यांनी बुधवारी रात्री वैष्णवीला काठीने बेदम मारहाण केली. यावेळी भाऊ श्रीधर आणि मामा संतोष अडसुळे यांनीही वैष्णवीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती त्यांचेही ऐकत नव्हती.

बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वैष्णवी पोवार हिला नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर मारहाण केलेले वळ होते. त्यामुळे पोलीस आणि डॉक्टरांना संशय आला. वैष्णवीला कोणी मारहाण केली याबाबत तिच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली तेव्हा आई व भावाचे नाव समोर आले.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुभांगी पोवार व श्रीधर पोवार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशीला प्रारंभ केला ,तेव्हा मुलगी प्रेम प्रकरणातून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणार असा हट्ट करत होती. त्यामुळेच तिला मारहाण केली आणि यात ती गंभीर जखमी झाली, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार आई ,भाऊ आणि मामा या तिघांवर वैष्णवी पोवार हिला मारहाण करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा या तिघांनाही लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा :

महाराष्ट्रात आज १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

आरबीआयच्या पतधोरणाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी