करण जोहरने केला मोठा धमाका, ‘किल’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या प्रोडक्शन बॅनरखाली(new movie trailers) तयार करण्यात आलेल्या ‘किल’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. निखिल नागेश भट्टने दिग्दर्शित केलेल्या किल या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटामध्ये लक्ष्य लालवानी, तान्या मानिकतला आणि राघव जुयाल हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

निर्माते आणि दिग्दर्शकाने ‘किल’चा टीझर रिलीज(new movie trailers) करत घोषणा केली आहे. या चित्रपटातून अभिनेता लक्ष्य लालवानी चित्रपटसृष्टीत एन्ट्री करत आहे. तसेच अभिनेत्री तान्या माणिकतलाचा हा पहिला बिग बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. याआधी ती विक्रांत मेस्सी आणि विजय सेतुपती स्टारर ‘मुंबईकर’ चित्रपटात दिसली होती. या दोन स्टार्ससोबत राघव जुयालही या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे.

किलच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक रोमांचक टीझर रिलीज केला आहे. जो थ्रिल आणि ॲक्शनने परिपूर्ण आहे. रिलीज झालेला टीझर इतका दमदार आहे की, तो पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहू लागले आहेत. या टीझरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे.

रिलीज झालेल्या ‘किल’ चित्रपटाच्या टीझरमध्ये लक्ष्य आणि तान्या एकमेकांसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. दोघेही ट्रेनने प्रवास करताना दिसतात. जिथे दोघेही एकमेकांशी टेक्स्ट मेसेजद्वारे बोलतात. तेवढ्यात काही गुंड ट्रेनमध्ये घुसतात. ज्याचा प्रवाशांना त्रास होतो. यानंतर लक्ष्यचा धमाकेदार ॲक्शन अवतार पाहायला मिळत आहे. यानंतर 1 मिनिट 20 सेकंदाच्या या टीझरमध्ये लक्ष्य एक एक करून गुंडांना धुवून काढतो. चित्रपटाचा टीझर इतका दमदार आहे की तो प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणेल. या टीझरने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली.

हा चित्रपट रेल्वे प्रवासावर आधारित असल्याचे टीझरवरून समोर आले आहे. चित्रपटाचा टीझर करण जोहरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक रात्र… एक ट्रेन… मारण्याचे एक कारण… किल’. 5 जुलै 2024 रोजी निर्माते हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या चित्रपटातून लक्ष्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी तो जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

हेही वाचा :

कोल्हापुरात तरुणीचा खून ….आई भाऊ आणि मामाला अटक

महाराष्ट्रात आज १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी