देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक(bank account) ऑफ इंडिया. आरबीआयने अलीकडे रेपोचे दर जैसे थे च ठेवले आहे. त्यामुळे कर्जधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये व्याजदर(bank account) कमी होण्याची शक्याता वर्तवण्यात आली होती. परंतु, आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीत कर्जधारकांना दिलासा देण्यात आला आहे.RBI MPC ने व्याजदरात म्हणजे रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो रेटचे दर 6.5% वर ठेवण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) मधील RBI MPC ची पहिली घोषणा आहे. मध्यवर्ती बँकेने एमपीसीच्या मागील सलग सहा बैठकांमध्ये रेपो दरात कोणताही बदल केला नाही त्यामुळे सर्वसामान्यांना या बैठकीतून पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. सातव्या बैठकीतही रेपो दर (Rate) ६.५ टक्केच ठेवण्यात आला आहे. निवडणूकांपूर्वी रेपो रेटमध्ये काही बदल होतील असे अनेकांना वाटत होते. परंतु, दर जैसे थे ठेवल्याने कर्जदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सध्या महागाईचा दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेला हा दर ४ टक्क्यांच्या खाली घ्यायचा आहे. महागाई दरात वाढ होत असल्याने आरबीआय सतर्क आहे. एमएसएफ दर ६.७५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. परंतु, आरबीआयनच्या गर्व्हनरने असे म्हटले की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी ७ टक्के वाढवण्याचा अंदाज आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढू शकतो.
हेही वाचा :
कोल्हापुरात तरुणीचा खून ….आई भाऊ आणि मामाला अटक
करण जोहरने केला मोठा धमाका, ‘किल’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट
उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी