बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री(www video) माधुरी दीक्षित आजही ग्लॅमरच्या जगामध्ये सक्रीय आहे. 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची आणि फिटनेसची आजही चर्चा होते. आपल्या दमदार अभिनय शैली आणि स्टाइलच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करते.
पण यावेळी माधुरी दीक्षित तिच्या लूक किंवा अभिनयामुळे चर्चेत आली नाही तर यावेळी ती गाण्यामुळे(www video) चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षितचा आवाज देखील खूपच मधूर आहे. माधुरीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती पती श्रीराम नेनेसोबत गाणं गाताना दिसत आहे.
माधुरी दीक्षित गाण्यामुळे लाइमलाइटमध्ये आली आहे. माधुरी दीक्षितचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. माधुरी दीक्षित पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत गाणं गाताना दिसते. श्रीराम नेने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये माधुरी दीक्षित एका पार्टीत गाणे गाताना दिसत आहे. त्यानंतर माधुरीसोबत तिचे पती डॉ. नेने देखील गाणं गाताना दिसतात. माधुरी दीक्षितचा गाण्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी माधुरी दीक्षितचे कौतुक करत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काळ्या आणि सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये माधुरी दीक्षित दिसत आहे. यावेळी माधुरी हातामध्ये माइक घेऊन हॉलिवूड सिंगर एड शीरनचे सर्वात लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे. अतिशय मधुर आवाजामध्ये ती हे गाणं परफेक्ट गाताना दिसत आहे. तसंच, एक पियानो वादक माधुरीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. माधुरी माइक धरून गाणे गात आहे. तेवढ्यात डॉ. नेने देखील तिच्यासोबत गाणं गायला लागतात. दोघेही खूपच सुंदर पद्धतीने हे गाणं गात इन्जॉय करताना दिसत आहे.
श्रीराम नेने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘परफेक्ट हे गाणे नेहमीच आमच्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. #EdSheeran चे हे गाणे गाताना खूप मजा आली.’ दरम्यान, माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, माधुरीची नेटफ्लिक्स सीरिज ‘द फेम गेम’ काही दिवसांपूर्वी रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये माधुरी सुपरस्टारच्या भूमिकेत दिसली होती. सध्या माधुरी दीक्षित डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
हेही वाचा :
ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; संजय राऊत यांचा दावा
शेतकऱ्यांनो, दरमहा ५५ रुपये भरा, महिन्याला ३ हजार पेन्शन मिळवा