UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय

पैसे बँकेत (upi app)जमा करण्यासाठी आपण लांबलचक रांगेत उभे राहतो. तसेच बँकेच्या या प्रोसेसमुळे आपल्याला भयंकर वैताग येतो. परंतु, येत्या पैसे जमा करण्यासाठी लांब लचक रांगेसोबत डेबिट कार्डची गरज भासणार नाही.

शुक्रवारी ५ एप्रिलला भारतीय रिझर्व्ह बँकेचे(upi app) शक्तीकांत दास म्हणाले की, आरबीआय लवकरच ग्राहकांसाठी UPI द्वारे रोख रक्कम बँकेत जमा करण्याची सुविधा सुरु करु शकते. नवीन आर्थिक धोरणादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपण सध्या यूपीआयच्या माध्यामातून एटीएमद्वारे पैसे काढतो.परंतु, यापुढे कोणत्याही बँकेत जाऊन एटीएममधील कॅशलेस सुविधेचा वापर करुन लगेच पैसे काढू शकता.

पतधोरण बैठकीत काय ठरले?
चालू आर्थिक वर्षाचा पहिला द्विमासिक चलनविषयक धोरणाचा आढावा सादर करताना आरबीआयचे (RBI) गर्व्हनर शक्तीकांत दास म्हणाले की, एटीएममध्ये यूपीआयचा वापर करुन कार्डलेस पैसे काढता येत आहे. पण लवकरच यूपीआय वापरुन कॅश डिपॉझिट करता येणार आहे.

ही सुविधा कधीपासून सुरु होणार?
सध्या आरबीआयने कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करण्याची सुविधा लवकरच सुरु करण्याची घोषणा केली आहे. परंतु, ही सुविधा कधीपासून सुरु होणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

रोख रक्कम बाळगण्यापासून स्वातंत्र्य
युपीआयची ही सुविधा सुरु झाल्यानंतर तुम्हाला रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. यामध्ये तुम्हाला स्कॅन करुन पैसे जमा करता येणार आहे.

हेही वाचा :

‘धक-धक गर्ल’च्या मधूर आवाजाने लावलं वेड VIDEO व्हायरल

देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस

दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; संजय राऊत यांचा दावा