आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली(prime) असून सगळेच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यातच विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणारा? हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याचेच आता स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध(prime) केला. यादरम्यान विरोधी पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणले की, ”इंडिया आघाडीने ठरवले आहे की, आम्ही विचारधारेच्या आधारावर निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल.”
पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, ही निष्पक्ष नाही तर फिक्स मॅच आहे. ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे लोकांनी समजून घेणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, ही निवडणूक संविधान आणि लोकशाही नष्ट करू पाहणारे आणि त्यांचे संरक्षण करू पाहणारे यांच्यातील आहे.
राहुल गांधी म्हणाले की, ”प्रसारमाध्यमांद्वारे जे वृत्त दिले जात आहे, त्यापेक्षा ही लढत खूप जवळची आहे. आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. 2004 साली ज्याप्रमाणे ‘इंडिया शायनिंग’चा प्रचार करण्यात आला होता, तसाच प्रचार आताही केला जात आहे, पण ती निवडणूक कोणी जिंकली हे लक्षात ठेवा.”
दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी जातनिहाय जनगणना करणे, आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त करणे, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणे आणि नवीन शैक्षणिक धोरणात सुधारणा करणे यासह अनेक आश्वासने दिली आहेत. पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे.
हेही वाचा :
‘रावेर’चा गड खालसा करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, भाजपच्या ‘या’ नेत्याला उमेदवारी?
सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ
टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच