उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘पाणी प्या’ असे कुणाला सांगावे लागत नाही. (water)या दिवसांमध्ये तहान लागते आणि लोक पाणी पितातच. मात्र, पाणी कधी कधी आवर्जून प्यावे याबाबत आहारतज्ज्ञांनी काही मार्गदर्शनही केलेले आहे. याबाबतची ही माहिती…
झोपेतून उठल्यानंतर : सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमचे अंतर्गत अवयव सक्रिय होण्यास मदत होते. यामुळे झोपेदरम्यान मंदावलेले तुमचे चयापचय पुन्हा सुरू होते, शरीर हायड्रेट होते (water)आणि विषारी घटकांचे उत्सर्जन करण्यासाठी मदत होते.
व्यायामानंतर : तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातील पाणी घामाने कमी होते. कसरत केल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातून गमावलेले द्रव भरून काढण्यास मदत होते. हायड्रेशनची पातळी स्थिर होते आणि तुमचे हृदय सामान्य गतीत येते. स्नायूंची पुनर्प्राप्ती व डिहायड्रेशन थांबवणे असे दुहेरी हेतू यातून साधता येतात.
झोपण्यापूर्वी : झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने दिवसभरातील द्रवपदार्थाची कमतरता भरून निघते. झोपेदरम्यान शरीरात अनेक क्रिया घडत असतात, त्यावेळी लागणारी ऊर्जा पाण्याच्या माध्यमातून पुरवता येऊ शकते तसेच यामुळे हायड्रेशन पातळी राखण्यात मदत होते. काहींना सकाळी उठताच तोंड कोरडे पडणे किंवा डोकेदुखीचा त्रास असतो, यासाठी झोपेपूर्वी किमान ग्लासभर पाणी पिणे आरामदायक ठरू शकते.
शरीर थकल्यावर : अनेकदा डिहायड्रेशनमुळेच थकवा जाणवू शकतो. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल, तेव्हा पाणी पिणे तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यात मदत करू शकते आणि उर्जा वाढवते. थकवा टाळण्यासाठी दिवसभर हायड्रेट राहणे महत्त्वाचे आहे.
आजारपणात : तुम्ही आजारी असता तेव्हा हायड्रेशन महत्त्वाचे असते. कारण, ते तुमच्या शरीराच्या नैसर्गिक कार्यांना सुरळीत करण्यासाठी मदत करते. पाणी प्यायल्याने शरीराचे योग्य तापमान राखण्यास मदत होते एकाप्रकारे शरीराला वंगण घालण्यास, पचनास आणि पेशींमध्ये पोषक सत्व आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याससुद्धा मदत होते. (Helth Tips)
हेही वाचा :
कोल्हापुरात तरुणीचा खून ….आई भाऊ आणि मामाला अटक
करण जोहरने केला मोठा धमाका, ‘किल’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट
उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी