कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर पोलिसांनी(police) मोरेवाडी परिसरातील गावठी दारू अड्ड्यांवर शनिवारी पहाटे छापे टाकले. आठ ठिकाणी टाकलेल्या या छाप्यात दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन ,काळा गुळ आणि तयार दारू असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला. स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
राजारामपुरी पोलीस(police) ठाण्यात आठ जणांवर बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करत असल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संशयित प्रकाश बागडे ,शक्ती माटुंगे ,चरण बागडे, प्रमोद बागडे , मनोज मिनेकर ,शेखर मछले, अजित बाटुंगे, रोहित माटुंगे सर्व राहणार कंजरवाट वसाहत मोरेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांचे उच्चाटन करत आहेत. मोरेवाडी परिसरात गावठी दारू तयार करणे त्याचे संपूर्ण जिल्ह्यात विक्री केली जाते त्यामुळे पोलिसांनी शनिवारी पहाटे या ठिकाणी छापे टाकून आठ गावठी दारू तयार करणाऱ्या उध्वस्त केले.
नऊशे लिटर तयार रसायन ,दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तयार दारू असा 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच ठिकाणी नष्ट केला.
हेही वाचा :
वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर
चेन्नईच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड या खेळाडूंवर भडकला
आखिर क्या मजबूरी है.. अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली Video