सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी; सभेतच लावली ऑडिओ क्लिप…

अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणुकीचा(audio clip) प्रचार आता अधिक रंगतदार होत आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांना दुसऱ्यांदा खासदार व्हायचंय आहे. त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.

सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप(audio clip) कामोठेतील सभेत लावण्यात आली. या क्लिपमधील शिव्या देणारा व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य तथा नीलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला, मात्र सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, असे विखे म्हणाले.

पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशदीत आयुष्य जगलं, मात्र आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात असल्याचे सुजय विखे पाटीलांनी पनवेल येथे झालेल्या सभेत सांगितले. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके हे आहेत.

सुजय विखेंना जीवे मारण्याची धमकी; सभेतच लावली ऑडिओ क्लिप…

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुजय विखे पाटलांना यश आले आहे. शिर्डी मतदारसंघात मात्र विखे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे या एकाच पक्षात असणाऱ्या राजकीय विरोधकांचे सुत मात्र जुळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोल्हेंची नाराजी कशी दूर करायची हे विखेंसमोर आवाहन आहे.

महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात शनिवारी सायंकाळी मेळावा झाला. मेळाव्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहालता काळे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

हेही वाचा :

लोकसभेच्या तोंडावर BRSला धक्का! के. कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

आता मित्राचं रडकं स्टेट्स पण पाहावं लागणार; WhatsApp मध्ये येत आहे नवीन फीचर

सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या