सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या

नागपुरतून धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात सिगारेट(smoking) ओढण्यावरून वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिगारेट(smoking) ओढण्यावरून वाद झाला. तरुणीने सिगारेटचा धूर शेजारी उभा असलेल्या तरुणाच्या तोंडावर सोडल्याने वाद झाला. त्यानंतर आरोपी तरुणी आणि तिच्या मित्रांनी या तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत २८ वर्षीय रणजित राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी जयश्री पानझरे, सविता सायरे, आकाश राऊत या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

रणजित राठोड या तरुणाचं कपड्याचे दुकान आहे. रणजीत आणि जयश्री या दोघांनी पानटपरीवरून सिगारेट खरेदी केली. जयश्रीने सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. जयश्रीने सिगारेट ओढताना रणजितच्या तोंडावर धूर सोडला. यांवरून दोघांमध्ये वाद झाला.

त्यानंतर जयश्री आणि तिची मैत्रीण सविताने रणजीतला शिवीगाळ केली. त्यानंतर जयश्रीने तिच्या आणखी मित्रांना फोन करून बोलावलं. जयश्री आणि तिच्या मित्रांनी मिळून रणजीतला मारहाण केली. या घटनेत सर्वांनी मिळून २८ वर्षीय रणजीतवर जीवघेणा हल्ला केला. जयश्री शिवीगाळ करताना रणजितने व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला होता.

या हल्ल्यात जखमी झालेल्या रणजीतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रणजीतचा मृत्यू झाला. रणजीतच्या मृत्यूने नागपुरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपींना अटक केली आहे. या घटनेतील पीडित रणजीतच्या मृत्यूने तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. तर २८ वर्षीय रणजीतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

लोकसभेच्या तोंडावर BRSला धक्का! के. कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

आता मित्राचं रडकं स्टेट्स पण पाहावं लागणार; WhatsApp मध्ये येत आहे नवीन फीचर

तूरडाळीचे भावही भिडणार गगनाला; स्वयंपाकघराचे ‘बजेट’ कोलमडणार?